कोल्हापूर - केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी आणि कामगारांच्या विरोधातील तीनही कायदे जोपर्यंत मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत शांत बसणार नाही, असा निर्धार आज ट्रॅक्टर रॅलीच्या समारोपावेळी करण्यात आला. तसेच "हरियाना' आणि "पंजाब' प्रमाणेच महाराष्ट्रात सुद्घा हे कायदे राबविला जाणार नसल्याचाही ठाम निर्धार येथे करण्यात आला. खोटे पॅकेज देणारे सरकार नको तर शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या हिताचे सरकार पाहिजे, यासाठी तालुकापातळीवर, गल्लोगल्ली याबाबत माहिती देण्याचे काम पुढील काळात केले जाईल,असेही नेत्यांनी भाषणातून स्पष्ट केले.